Saturday, April 16, 2011

महा विजय भारताचा

महा विजय भारताचा




दनानाले स्टेडियम

जल्लोष मोठा जाहला धोनीच्या टीमने "विश्वकरंडक" जिंकला


उजलले आकाश

सागर उचमबल्ला

आकाशी चंद्राने

"सलाम" टीमला केला



देशभर विजयाचे

वारे वाहू लागले

लात आली आनंदाची

ढोल ताशे वाजले



जगभर झाले कौतुक

भारताची शान वाढली

अत्ठावीस वर्षांची

आस अखेर पूर्ण झाली


-मधुकर भिड़े


पुणे (०२०-२५४४४०१४)

Sunday, March 6, 2011

काही बोलायाचे आहे

काही बोलायाचे आहे
पण बोलणार नाही
मालिका सुरु असताना
"व्यत्यय" त्यात आणणार नाही

ओफिसतुन येता येता
वाजतात रोज सात
त्याच वेळी सुरु होती
"मालिका" अनेक

कोणी नाही ऐकून घेत
नाही कोणी लक्ष ही देत
आशा वेळी शब्द माझे
वाया घलाविनार नाही

लक्ष असे टीवी वर्ती
गुंग सर्व "मालिकेत "
भान नसे इतर जगाचे
बसतो मी मग शांत

"ब्रेक" शिवाय मी आता
तोंद उघडणार नाही
काही बोलायाचे आहे
पण बोलणार नाही

- मधुकर भिड़े ( पुणे )
(020 - 25444014)
( +91-9326960226)

Saturday, February 12, 2011

माझीया प्रियेला चैन पडेना

माझिया प्रियेला चैन पडेना
"दिवाळी" आता जवळी येई
सर्वत्र "सेल ची" धमाल होई
किती कुठे ती करू खरेदी
उमगेना तिला

बाजारात मग कुठेही जाता
ठिकठिकाणी "सेल च्या" पाट्या
पन्नास टक्के सूट बघुनी
वेड लगे तिला

झोपेतही अचानक ती
"सेल सेल " ओरडे
चला जाउया खरेदी करुया
हेच म्हणे ती माला

काय करावे काही न समजे
समजाउनी ही ती न समजे
"बोनस " अजुनही हाती न आला
सांगू कसे तिला

प्रश्न जेव्हा गंभीर झाला
खरेदीचा लागे तगादा
"क्रेडिट कार्ड " तिच्या हाती देता
आनंद होई तिला

-मधुकर भिड़े (पुणे )

दांडी तुझी असते जेव्हा


दांडी तुझी असते जेव्हा, जीव मेटाकुट्टीला येतो
भांड्यांचा बघून ढिगारा, संताप मनाचा होतो


सवारते मी स्वतहाला, हॉलचाच केर निघतो
डबा न मिळे कोणाला, नाश्ताही बाहेर होतो


आवरून निघता निघता , ओफ्फिसला लेट होतो
लक्ष कुठे लागेना , कामाचा गोंधळ होतो


फ़ोन दुपारी यांचा , जेवाया मित्र येणार
घालमेल होई जिवाची , हे कसे सर्व जमणार


निश्चय मग होई मनाचा , जेवण घेऊ बाहेर
खुश होती मंडली सारी , दिवसही जाई छान


दांडी तुझी असते जेव्हा, मनस्ताप जरी होतो
अनुभव घरकामाचा , पुन्हा नव्याने येतो


- मधुकर भिड़े (पुणे)